मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध – Marathi Shahityatil Suvarn Kan Nibandh
मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध – Marathi Shahityatil Suvarn Kan Nibandh ज्याप्रमाणे एखादा वृक्ष हळूहळू त्याच्या परिस्थितीनुसार पल्लवित होतो. त्याचप्रमाणे साहित्याची निर्मितीही हळूहळू विचारवंत, लेखकांच्या काल परिस्थितीवर अवलंबून असते. मराठी साहित्याची प्राचीन, अर्वाचीन आणि नव साहित्य अशी काळानुसार विभागणी करण्यात येते. प्रत्येक काळात सुवर्णमोलाचे साहित्य आहे. सुवर्णाची कांती-ज्याप्रमाणे नष्ट होत नाही त्याप्रमाणे या साहित्याची कांती निस्तेज झाली नाही. हे सर्व साहित्य आपल्या पूर्व साहित्यापेक्षा उत्कृष्ट आहे. प्राचीन काळातील साहित्य भक्तिरस प्रधान व आध्यात्मिकतेकडे वळणारे होते. त्याचबरोबर समाजाला बंधुभाव, प्रेम, ईश्वरभक्ती, भूतदया शिकविणारे होते. त्यामुळे समाज संघटित झाला व ईश्वरभक्ती केंद्रस्थानी ठेवून जीवन जगू लागला. बाराव्या शतकातील ‘ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी’ महानुभावांचे लीळाचरित्र, चक्रधर चरित्र, दृष्टांतपाठ इ० साहित्य, याही पूर्वीच्या वैदिक काळातील वेदांनी समाजाला आचरणाचे धडे दिले. उपनिषदांनी जीवनातील तत्त्वज्ञान सांगितले. पंढरपूरच्या वारकरी संप्रदायातील नामदेव, तुक...